
Vishal Kotian-Raquesh Bapat यांनी यापूर्वीही बिग बॉसचा गेम खेळलाय?
Big Boss Marathi Season 6 आता दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. ४ आठवड्यांवर ग्रॅण्ड फिनाले आला असन घरातील प्रत्येक सदस्य अधिक स्ट्रॉंगपणे आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे टोळी ग्रुपला आता Individual गेम खेळायला हवा हे माहित झालं आहे, पण दुसरीकडे काटा ग्रुप अजूनही एकत्रच खेळत असल्याचं दिसतंय, आणि प्रेक्षकांनाही कुठेतरी आता तेच तेच पाहणं बोअर झालं आहे. नुकताच घरात Ticket To Finale साठी नॉमिनेशन टास्क झाला आणि यावेळी Raquesh Bapat ने विशालला नॉमिनेट केलं. बरं, हे इथवर थांबलं नाही ते थेट अगदी दोघांच्या पर्सनल आयुष्यापर्यंत पोहोचलं. इतकं की त्यात Vishal Kotian ने राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. परंतु, तुम्हाला माहित आहे का यापूर्वी देखील विशाल कोटियन आणि राकेश बापट यांनी एकत्र बिग बॉसचा गेम खेळला आहे? (Big Boss Marathi season 6 nomination task)
तर, जर का तुम्हाला असं वाटत असेल की विशाल आणि राकेश पहिल्यांदाच बिग बॉसमध्ये एकमेकांना भिडले आहेत तर ते तसं नाही आहे. हिंदी Big Boss Season 15 मध्ये विशाल कोटियन स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि त्याच सीझनमध्ये राकेश बापट वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून आला होता. त्या सीझनमध्ये Shamita Shetty देखील होती आणि दोघांचं अफेअर देखील घरात झालं होतं. त्यांचं रिलेशन बिग बॉसच्या घरात आणि बाहेरही प्रचंड गाजलं, पण काही कारणांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. (Raquesh Bapat & Shamita Shetty Affair)

हिंदी बिग बॉसच्या घरात असताना देखील विशाल आणि राकेश एकमेकांना कायम भिडले होते. त्यावेळी निमित्त होतं शमिता आणि राकेशचं अफेअर. हिंदी बिग बॉसच्या त्या सीझनमध्ये शमिता आणि विशालचं नातं भावा-बहिणीसारखं होतं. मात्र, विशाल कायमच तिच्या मागे वाईट बोलताना दिसत होता. काही कारणांमुळे राकेश जेव्हा घरातून बाहेर गेला तेव्हा सलमानने शमिताला सांगितलं की राकेश आता परत येणार नाही. ते ऐकून शमिता इमोशनली डाऊन झाली होती, पण विशालने आसुरी हास्य दाखवत बरं झालं आता राकेश नाहीये असं म्हणते खिल्ली उडवली होती. (Vishal Kotian & Raquesh Bapat fight)

आता राकेश आणि विशाल यांनी त्यांचं Big Boss Season 15 मधलं इक्वेशन मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये आणलं आहे. पुन्हा एकदा एकमेकांच्या पर्सनल गोष्टींवर भाष्य करत अंगावर जाण्याइतपत घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम विशालच्या गेमवर झाला असून संपूर्ण सीझनभर बिग बॉसने त्याला थेट नॉमिनेट करत कॅप्टन्सी उमेदवारी काढून घेतली आहे. आणि दुसरीकडे राकेश या आठवड्यात थेट नॉमिनेट होत कॅप्टन होऊ शकणार नाही. आता या आठवड्यात दोघांपैकी कुणी घराबाहेर जाणार का? हे पाहण्याची उस्तुकता दिवसागणिक वाढत आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi Season 6 : तन्वी आणि विशाल फायनलिस्ट आहेत का?
================================

बरं, राकेश आणि विशाल एकमेकांसोबत या पूर्वी बिग बॉस खेळले आहेत हे आपल्याला समजलं. पण राकेश-विशाल आणि Rakhi Sawant हे त्रिकूट जे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये दिसतंय तेच बिग बॉस हिंदीच्या पंधराव्या सीझनमध्येही एकत्र होतं. मात्र, या सीझनमध्ये तिघेही एकमेकांना फारसे ओळखतच नाहीत आणि कुणाला गेम त्यांना माहित नाही असं दाखवत असल्यामुळे प्रेक्षकही तिघांच्या गेमचं कौतुक करत आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचे टॉप ५ स्पर्धक कोण असणार? त्यात राकेश बापट आणि विशाल कोटियन असणार का? हे पाहण्यासाठी १३व्या आठवड्याचा (Riteish Deshmukh) भाऊचा धक्का फार महत्वाचा असणार यात शंकाच नाही.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi