Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या मैत्रीला लागलं ग्रहण?

बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवे राडे तर होत असताच पण घरातील नाती देखील दिवसागणिक बदलत असतात. राखी सावंत आणि राकेश बापट यांच्या मैत्रीवरुन सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर चक्क राकेश आणि राखीचं गमतीत लग्न पण लावून दिलं होतं. मात्र, आता राकेश आणि राखी यांच्या मैत्रीत मीठाचा खडा पडल्याचं दिसतंय. (Rakhi Sawant & Raquesh Bapat)

गेल्यावेळी राकेश आणि तन्वी यांनी एकत्र केलेल्या डान्समुळे राखी दुखावली होती आणि तिने चक्क आपले केस कापून टाकले होते. परंतु नुकत्याच एका प्रोमोमध्ये राखी आणि राकेश यांच्यात शाब्दिक वाद होऊन ती स्विमींग पूलमध्ये उडी मारतेय असं दिसलं. प्रोमोमध्ये दिसलं की, राखीचं सांत्वन करण्यासाठी राकेश तिच्याजवळ येतो. यावेळी “आपण फक्त मित्र आहोत” या वाक्यावर राकेश जोर देतो. यानंतर राखी त्याला पुन्हा विचारते, “म्हणजे आता आपण फक्त मित्र आहोत का?” पण राकेश, “मला दुसऱ्यांना हर्ट करायचं नाहीये” असं म्हणत तिथून निघून जातो”. ( Big Boss Marathi 6 Reality Show)

यानंतर राखी ‘I Am Loser’ म्हणत स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. एकूणच राकेशच्या वागण्याचा राखीला प्रचंड त्रास झालेला दिसून आला. घरातील सदस्य तिला पूलमधून बाहेर काढण्यासाठी धावत आल्याचं देखील दिसलं. आता तिच्या या कृतीमुळे तिला दुखापत झाली आहे का? घरातले काय रिएक्ट करणार आणि रितेश भाऊ धक्क्यावर याबद्दल काही बोलणार का हे पाहण महत्वाचं असणार आहे. (Entertainment Queen Rakhi Sawant)

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार नाही’; रुचिता आणि विशालच्या नात्यात दुरावा

================================

तसेच, या आठवड्यात राखी सावंत, दिपाली सय्यद, रुचिता जामदार आणि संकेत पाठक यांच्यापैकी घराचा नवा कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तसेच, प्राजक्ता, तन्की, प्रभू, रुचिता, संस्कृती आणि सागर यांच्यापैकी घराबाहेर कोण जाणार हे देखील पाहण तितकंच महत्वाचं आहे. (Tanvi Kolte)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!