Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dev Anand-सुचित्रा सेनचा संगीतप्रधान पण बोल्ड विषय असलेला ‘बंबई का बाबू’!

राज खोसला दिग्दर्शित ‘बंबई का बाबू’ (१९६०) हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय संगीतप्रधान ‘बोल्ड’ कलाकृती मानली जाते. वरवर पाहता हा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कौटुंबिक ड्रामा वाटत असला, तरी याच्या कथानकात दडलेले मानवी नातेसंबंधांचे पदर आजही प्रेक्षकांना थक्क करतात. या चित्रपटाचा मुख्य कणा हा आपली ‘आयडेन्टीटी  बदलणे ‘ किंवा  ‘ओळख बदलून वावरणे’ हा आहे. नायक बाबू (देव आनंद) एका गुन्ह्यामुळे अडचणीत येतो आणि एका श्रीमंत कुटुंबाचा हरवलेला मुलगा ‘कुंदन’ बनून त्यांच्या घरात प्रवेश करतो. मात्र, खरी गुंतागुंत तिथे सुरू होते जेव्हा त्याला त्याच घरातील मुलगी माया (सुचित्रा सेन ) हिच्याबद्दल त्याला आकर्षण वाटू लागते.  

रक्ताच्या नात्याने ते भाऊ बहीण नसतात पण समज मात्र त्याना तसे समाजात असतो. बहीण-भावाच्या पवित्र नात्याच्या पडद्या आड असताना फुलणारे हे ‘निषिद्ध’ प्रेममांडण्याचे धाडस १९६० च्या काळात राज खोसला यांनी दाखवले, हे विशेष. देव आनंद: आपल्या नेहमीच्या स्टाईलला बाजूला सारून देव आनंदने इथे एक अपराधी भाव (guilt) असलेला प्रियकर उत्तम साकारला आहे. तो जितका रोमँटिक दिसतो, तितकाच स्वतःच्या परिस्थितीमुळे हताशही वाटतो. सुचित्रा सेन चा अभिनय अतिशय वरच्या श्रेणी चा होता. तिच्या डोळ्यांतील निरागसता आणि कुंदनबद्दल वाटणारी ओढ, जी ती व्यक्त करू शकत नाही, तिने अतिशय संयमितपणे मांडली आहे.एस. डी. बर्मन यांच्या अजरामर संगीताने हा चित्रपट आजही रसिकाना आवडतो.

‘दीवाना मस्ताना हुआ दिल’ रफी -आशा च्या स्वरातील धुंद प्रेमाची एक वेगळीच नशा चढवणारे गाणे खमाज रंगत बांधले होते.  मुकेश एस डी कडे फार कमी गायला . या सिनेमात त्याने गायलेलं  यमन रागातील ‘चल री सजनी अब क्या सोचे’ हे बिदाईचे गाणे आजही डोळ्यात पाणी आणते.रफी च्या स्वरातील ‘साथी ना कोई मंजिल’: एकाकीपणाचे विदारक चित्रण करणारे गाणे. या चित्रपटात त्यांनी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही वातावरणाचा वापर करून कथेतील रहस्य जिवंत ठेवले आहे. विशेषतः क्लोज-अप शॉट्सचा वापर पात्रांच्या मनातील द्वंद्व टिपण्यासाठी प्रभावीपणे केला आहे. सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री होते.

================================

हे देखील वाचा : Dev Anand यांनी ‘या’ तीन इंग्रजी चित्रपटात काम केले होते!

================================

चित्रपटाचा शेवट अत्यंत वास्तववादी आहे. बाबू गुन्हेगारी सोडून चांगला माणूस बनू पाहतो, पण प्रेमाच्या बाबतीत तो कायमचा हरतो. चुकीच्या पायावर उभी केलेली नाती कधीही सुखाचा संसार थाटू शकत नाहीत,” हाच जणू यातून संदेश मिळतो. प्रेक्षकांना बाबूची दया येते, पण नियतीला त्याचे वागणे मान्य नसते. ‘बंबई का बाबू’ हा केवळ एक मसाला पट नाही, तर तो मानवी वासना, नैतिकता आणि अपराधीपणाच्या भावनेचा एक खोल प्रवास आहे. आजही हा चित्रपट त्याच्या ‘बोल्ड’ विषयासाठी आणि मधुर संगीतासाठी तितकाच ताजा वाटतो.

या चित्रपटाला त्या काळात व्यावसायिक यश मिळाले नाही पण या चित्रपटातील गाणी जबरदस्त हिट ठरली.  गीतकार मजरूह  सुलतानपुरी आणि संगीतकार सचिन देव बर्मन ही जोडी पुन्हा एकदा लोकप्रिय ठरली.  पण चित्रपटातील भाऊ-बहीण या नात्याचा अँगल व त्यातून बोल्ड  मेसेज जाणारा हा चित्रपट समाजाच्या पचनी  पडणे शक्य नव्हते.  चित्रपटाचे कथानक ख्यातनाम लेखक O. Henry‘s यांच्या “A Double-Dyed Deceiver”. लघुकथेवर आधारीत होते. याच कथेचा प्लॉट अमिताभ बच्चन आणि सायरा बानू च्या जमीर या सिनेमाला वापरला होता. त्या सिनेमाला देखील अजिबात व्यावसायिक यश लाभले नाही.

================================

हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

=================================

‘बंबई का बाबू’ या सिनेमात देव आनंद सोबत मधुबाला हिला कास्ट करण्यात आले होते तसे प्रमोशनल पोस्टर्स देखील आले होते पण तिच्या आजारपणामुळे हा सिनेमा सुचित्रा सेन यांच्याकडे आला.या सिनेमाचे शूटिंग पाहायला पंजाब चे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंग कैरो आले होते. अभिनेत्री सुचित्रा सेन आणि दिग्दर्शक राज खोसला यांचे या चित्रपटाचा सेटवर एकदा कडाक्याचे भांडण झाले होते त्यानंतर अभिनेत्री सुचित्रा सेने शूटिंग अर्धवट सोडून आपल्या पती समेत कलकत्त्याला निघून गेली होती. सिनेमाचे शूट खोळंबले . शेवटी हे भांडण कोर्टात गेले. तिथे कोर्टाने सुचित्राला शूट पूर्ण करण्याचा आदेश दिला!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!