Skip to content Skip to sidebar Skip to footer

Mi Savitribai Jotirao Phule मालिकेत नवा टप्पा, नवी लढाई! डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची एन्ट्री !

मी सावित्रीबाई जोतीराव फुले (Mi Savitribai Jotirao Phule) या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत असून, आता कथा एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत सावित्रीबाई आणि जोतीराव यांचं बालपण, त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे संघर्ष आणि शिक्षणासाठीची तळमळ प्रेक्षकांनी जवळून अनुभवली. आता ही कथा अधिक व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पुढे सरकणार आहे.(Mi Savitribai Jotirao Phule)

Mi Savitribai Jotirao Phule Amol Kolhe
Mi Savitribai Jotirao Phule

समाजात रुजलेल्या जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत “शिक्षण हाच खरा मार्ग” हा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न मालिकेत ठळकपणे मांडला जाणार आहे. स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई आणि जोतीराव यांनी घेतलेली धाडसी पावलं, त्यांना सहन करावा लागलेला विरोध आणि त्यामागची जिद्द आता अधिक प्रभावीपणे उलगडली जाणार आहे.

Mi Savitribai Jotirao Phule Amol Kolhe
Mi Savitribai Jotirao Phule

या महत्त्वपूर्ण टप्प्याला अधिक भक्कम बनवण्यासाठी मालिकेत दोन दमदार कलाकारांची एंट्री होत आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) आणि डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे कथेला आणखी वजन आणि वास्तवता लाभणार आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी सावित्रीबाईंच्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त करताना सांगितलं की, “सावित्रीबाई फुले यांसारख्या युगस्त्रीची भूमिका साकारणं ही मोठी जबाबदारी आहे. आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो, त्यामागे त्यांचा मोठा संघर्ष आहे. त्या महान व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर साकारताना अभिमानासोबतच एक वेगळं दडपणही जाणवतं.”(Mi Savitribai Jotirao Phule)

=======================================

हे देखील वाचा: Gaurav More: “झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण…” फिल्टरपाड्याचा बच्चनसाठी अभिनेत्री Chhaya Kadam यांची खास पोस्ट!

=======================================

तर डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं की, “जोतीराव फुले म्हणजे विचारांची ज्वाला आहेत. समाजातील अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांच्या विचारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे.” एकूणच, मालिकेचा पुढील भाग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, सामाजिक जाणिवा जागृत करणारा ठरणार आहे. शिक्षण, समता आणि परिवर्तन यांचा संदेश देणारी ही कथा आता आणखी प्रभावी स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!