Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: हिटलरची होणार बिग बॉसच्या  घरात एंट्री? राकेश बापटचं नाव निश्चित झाल्याची चर्चा 

Colors Marathi वरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस मराठीचा सहावा सीझन लवकरच सुरू होणार असून, अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या नव्या पर्वाबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, चॅनेलच्या सोशल मीडियावरून पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून, यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. याच दरम्यान, अभिनेता राकेश बापट ( Rakesh Bapat) याचं नाव बिग बॉस मराठी ६ साठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

मिळालेल्या माहितीनुसार, लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navari Mile Hitlarla) मधील मुख्य भूमिकेमुळे चर्चेत आलेला राकेश बापट या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याची निवड जवळपास अंतिम टप्प्यात असून, बिग बॉसच्या घरात त्याची एन्ट्री निश्चित मानली जात आहे. यापूर्वी राकेश हिंदी बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता, त्यामुळे मराठी बिग बॉसमधील त्याचा प्रवास पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र, याबाबत राकेश किंवा त्याच्या टीमकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Bigg Boss Marathi 6

यंदाचा सीझन केवळ स्पर्धकांमुळेच नाही तर भव्य आणि वेगळी थीम यामुळेही खास ठरणार आहे. या वेळचं बिग बॉसचं घर ‘स्वर्ग आणि नर्क’ या संकल्पनेवर आधारित असणार असून, स्पर्धकांसाठी आव्हानांचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक थरारक अनुभव मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.  (Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली हिंट

============================

महत्त्वाचं म्हणजे, ११ जानेवारीपासून बिग बॉस मराठी ६ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राकेश बापटसह सध्या सागर कारंडे, दिपाली सय्यद, अनुश्री माने, राधा मुंबईकर, संकेत पाठक, प्राजक्ता शुक्रे आणि रसिका जामसुदकर या नावांचीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. या चर्चेतील नेमके कोणते चेहरे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार, हे मात्र शो सुरू झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता वाढतच जाणार, यात शंका नाही.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!