
Pooja Sawant : ‘कलरफूल’ नावामागची इंटरेस्टींग गोष्ट!
मराठी अभिनेत्रींचा ऑरा खरंच काही वेगळाच असतो… बॉलिवूडमध्ये हिंदी अभिनेत्रींना तोडीस तोड कॉम्पिटिशन देण्याती धमक प्रत्येक मराठी अभिनेत्रीकडे आहे… अशीच एक अभिनेत्री जिला एका स्पर्धेतून चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिने त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं.. ती आहे महाराष्ट्राची कलरफुल अभिनेत्री Pooja Sawant… मराठी चित्रपटसृष्टीची दीपिका पादूकोण अशीही तिची ओळख आहे बरं का.. पण तुम्हाला माहित आहे का पूजाला एक कलरफुल हे नावं नेमकं कसं पडलं? जाणून घेऊयात याचा एक इंटरेस्टिंग किस्सा….(Entertainment News)
नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत पूजा सावंत हिने तिच्या जुन्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला.. बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये तिने उल्लेखनीय काम केलं आहे आणि आपल्या ते लक्षातही आहे.. पण तिची सर्वात लोकप्रिय झालेली भूमिका होती ती म्हणजे Dagadi Chawl या चित्रपटातील सोनल ही भूमिका… या चित्रपटात Ankush Chaudhari म्हणजेच सुर्या जेव्हा पहिल्यांदा सोनलला पाहतो तेव्हा तो तिला ए कलरफुल असं म्हणतो… तर या नावामागचा किस्सा सांगताला पूजा म्हणाली की, “याचं मी संपूर्ण श्रेय प्रेक्षक तसेच अंकुश आणि चंद्रकांत सर यांना देईन. कारण, कलरफूल हे नाव त्यांनी मला दिलं. आणि महाराष्ट्रातील जनतेनं ते नाव फार मोठं केलं. आता मला लोकं कलरफूल याच नावाने जास्त ओळखतात. त्यामुळे मला असं वाटतं आयुष्यभर प्रेक्षकांनी या मला याच नावाने ओळखावं.” (Marathi Movie)

पुढे पूजाने ‘दगडी चाळ’ चित्रपटाच्या आठवणी शेअर करताना असं म्हटलं की, “दगडी चाळ हा प्रेक्षकांनी मोठा केलेला चित्रपट आहे. त्यातील सूर्याचं पात्र, आणि सोनल या कलरफूल भूमिकेला प्रेक्षकांनीच मोठं केलं आहे. तेव्हा आम्ही काळा चौकीतील खऱ्याखुऱ्या चाळीत शूट केलं होतं. मी साकारलेलं पात्र आणि सूर्या एकाच चाळीत राहात असतात. चाळीतली जी प्रेमकथा आहे ती चित्रपटात फार प्युअर दाखवली गेली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी यात हेरल्या आहेत. म्हणजे काय तर आपल्याला एकमेकांच्या वेळा माहित असतात. अरे… ही या वेळेत क्लासमधून येते आणि तो बरोबर तेव्हा बाल्कनीत उभा असतो. त्या सगळ्या गोष्टी मला खूप जवळून अनुभवता आल्या.” (Romantic & Action Movies)

आता जर का तुम्हाला असं सांगितलं की पूजाला रंगपंचमी खेळायला आवडत नव्हतं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे… मुलाखतीत तिनेच याचा खुलासा करत म्हटलं होतं की,”यापूर्वी मी रंगपंचमी कधीच खेळले नाही. कारण,मला रंग खेळणं आवडायचं नाही. तेव्हा शूटच्या दिवशी मी अंकुश सरांना सांगितलं होतं की सर… मला जरा कमी रंग लावा. कारण, मी रंग खेळत नाही. हेच माझं चुकलं. त्यावेळी मला खूप रंग लावण्यात आला. आणि त्याक्षणी कलरफूल हे नाव सूचलं. खरं तर ते नाव स्क्रिप्टमध्ये नव्हतचं. अंकुश सर आणि चंद्रकांत सरांनी ते नाव ठरवलं, इतक्या नकळतपणे आलेलं ते नाव अजरामर झालं आणि विशेष म्हणजे त्यानंतर मी रंगपंचमी अगदी मनापासून खेळायला लागले.”

आता जरा पूजाच्या इतर चित्रपटांवर नजर टाकूयात… श्रावणक्वीन ही स्पर्धा जिंकत पूजा सावंत हे नाव मराठी इंडस्ट्रीला समजलं… ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रटातून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली.. त्यानंतर अंकुश चौधरी सोबत झकास या चित्रपटात ती झळकली… त्यानंतर ‘सतरंगी रे’, ‘पोश्टर बॉईज’, ‘बाली’, ‘लपाछपी’, ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ २’, ‘लव्ह यु मित्रा’, ‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’, ‘नीळकंठ मास्तर’, ‘बोनस’, ‘अमायरा’, ‘बस स्टॉप’ अशा मराठी चित्रपट आणि सीरीजमध्येही तिने काम केलं आहे… चित्रपटांव्यतिरिक्त ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’, ‘जल्लोष सुवर्णयुगाचा’ या रिअॅलिटी शोचा देखील ती भाग होती… (Pooja Sawant Movies)
================================
================================
२०२४ मध्ये तिने Siddhesh Chavan याच्याशी लग्नगाठ बांधली आणि काही काळासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली… परदेशात सेटल झालेली पूजा आता पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली असून नुकताच तिचा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट रिलीज झाला… तसेच, येत्या काळात ‘सालबर्डी’, ‘कप-बशी’ असे बरेच चित्रपट ती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे… बऱ्याच अभिनेत्री लग्नानंतर परदेशात जाऊन स्थायिक झाल्या… काहींनी कायमची इंडस्ट्री सोडली तर काहीजणी आजही आपलं अभिनयाचं, नृत्याचं पॅशन फॉलो करताना दिसतात आणि त्यापैकीच पूजा ही एक आहे… (Pooja Sawant Upcoming Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi