
Dhurandhar 2 आता नेटफ्लिक्सवर नाही तर ‘या’ OTTवर पाहता येणार!
स्पाय चित्रपटांची कॉन्सेप्ट आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge चित्रपटाने पूर्णपणे बदलून टाकली आहे… तसेच, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील (Spy Universe Of Bollywood) सलमान खान, शाहरुख खान, ह्रतिक रोशन यांच्या Acting लाही Ranveer Singh याने खाऊन टाकलं आहे… २०२५ हे वर्ष Ranveer Singhचं होतं आणि आता २०२६ हे वर्ष देखील रणवीरचंच वर्ष ठरलं आहे… हिंदी भाषेतील १००० कोटी कमावणारा तो पहिला चित्रपट ठरला असून बॉलिवूडमध्ये 1000 Cr Club ची सुरुवात रणवीर सिंगच्या धुरंधरने केली आहे… थिएटरमध्ये हाऊसफुल्ल सुरु असणारा धुरंधर २ घरबसल्या कधी आणि कुठे पुन्हा पाहता येणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.. जाऊन घेऊयात ‘धुरंधर २’ च्या ओटीटी अपडेटबद्दल… (Dhurandhar 2 OTT update)
थिएटरमध्ये कोणताही चित्रपट कितीही गाजला तरी तो पुन्हा एकदा ओटीटीवर पाहण्याची मजा वेगळीच असते… माझ्यामते कुठलाही पहिला चित्रपट पहिल्यांदा आपण प्रेक्षक म्हणून पाहतो, तर दुसऱ्यांदा डिरेक्टरच्या नजरेतून आपण तो चित्रपट पुन्हा पाहतो… आणि तिसऱ्यांदा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या नजरेतून आपण एका आणखी वेगळा अॅंगलने ती कथा चाचपडतो.. आता धुरंधर २ हा चित्रपट देखील घरबसल्या लोकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे… मध्यंतरीच्या काळात ‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजवरुन फार गदारोळ झाला होता… नेटफ्लिक्सवर ‘धुरंधर’ रिलीज झाला होता… मात्र, आता धुरंधर २ नेटफ्लिक्स ऐवजी Jio Hotstar या ओटीटीवर पाहता येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत… इंडस्ट्री रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे डिजिटल हक्क JioHotstar ने खरेदी केले आहेत. (Dhurandhar movie news)

सर्व साधाराणपणे कोणताही चित्रपट थिएटरमध्ये ५०-८० दिवस पूर्ण केल्यानंतर कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतो… त्यामुळे अद्याप ‘धुरंधर २’ च्या ओटीटी रिलीजची डेट अधिकृतपणे जाहिर झाली नसली तरी मे अखेरीस किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात परत हमजा अलीला भेटण्याची संधी आपल्याला मिळणार आहे… सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे ओटीटी रिलीज होल्डवर ठेवण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे.. त्यामुळे जेव्हा IPL संपेल त्यानंतरच डिलीटली चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे… (Entertainment News)

दरम्यान, ‘धुरंधर २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर रणवीर सिंग याने त्याच्याच प्रत्येक चित्रपटाच्या दुप्पट कमाई केवळ एका चित्रपटातून केली आहे… बॉलिवूडच्या खान्सना मागे टाकत त्याने एक नवा दर्जा सेट केला आहे… ‘धुरंधर २’ ने वर्ल्डवाईड 1671.26 Cr कमावले आहेत, तर भारतात 1055.12 Cr इतकी कमाई केली आहे.. या चित्रपटाने Pushpa 2 च्या कलेक्शनलाही मागे चाकलं असून आता लक्ष्य २००० कोटींचा टप्पा पार करण्यावर आहे… (Dhurandhar 2 box office collection)
================================
================================
एकीकडे ‘धुरंधर’ सुस्साट सुरु असताना दुसरीकडे रणवीर त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत आहे… फरहान अख्तर दिग्दर्शित Don 3 : The Final Chapter मध्ये त्याची वर्णी लागली असून पुन्हा एकदा एका वेगळ्याच अंदाजात रणवीरला पाहण्याची संधी मिळणार आहे… या शिवाय प्रलय आणि शक्तिमान हे चित्रपटही येणार असल्याच्या चर्चा आहेत… तसेच, पुन्हा एकदा रणवीर सिंग आणि Deepika Padukone ही जोडी स्क्रिनवर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा असून येत्या काळात ती पुर्ण होणार का हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे… (Ranveer Singh Upcoming Movies)

आता एक नजर जरा रणवीर सिंगच्या आधीच्या चित्रपटांवर आणि वर्ल्डवाईड कलेक्शनवर टाकूयात… ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’ 51 Cr, ‘लुटेरा’ 47 Cr, ‘गोलियो की रासलीला-रामलीला’ 212 Cr, ‘गुंडे’ 130 Cr, ‘किल दिल’ 56 Cr, ‘दिल धडकने दो’ 150 Cr, ‘बाजीराव मस्तानी’ 361 Cr, ‘बेफिकरे’ 101 Cr, ‘पद्मावत’ 568 Cr, ‘सिंबा’ 394 Cr, ‘गल्ली बॉय’ 234 Cr, ’83’ -193Cr, ‘सर्कस’ 61 Cr, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ 357 Cr, ‘धुरंधर’ 1305.7 Cr. आत्तापर्यंत रणवीरच्या कोणत्याच चित्रपटाने 600 Cr देखील पार केले नव्हते. पण केवळ Dhurandhar या फ्रेंचायझीने सगळ्या चित्रपटाच्या कमाईपेक्षा दुप्पट कमाई करुन दाखवली आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi