Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ladki Bahin Marathi Movie: ‘लाडकी बहीण’ चित्रपटातून सामाजिक विषयाला विनोदी स्पर्श; गौतमी पाटील महत्वाच्या भूमिकेत झळकणार !

काही चित्रपट त्यांच्या घोषणेनंतरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतात. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Movie) या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या चर्चेत असलेल्या ‘लाडकी बहीण योजने’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट साकारण्यात आला आहे. समाजातील या योजनेचा महिलांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याचा वेगळ्या पद्धतीने वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. “१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी” ही चित्रपटाची टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून हा चित्रपट १७ एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन शितल शिंदे (Shital Shinde) यांनी केले असून निर्मिती शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. तर बाबासाहेब पाटील कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहत आहेत. लेखक प्रताप गंगावणे यांचे मार्गदर्शन चित्रपटाला लाभले असून शेखर मते, पंकज चव्हाण, तृप्ती देसाई आणि लहू साळुंखे यांनीही विशेष सहकार्य केले आहे.(Ladki Bahin Marathi Movie)

Ladki Bahin Marathi Movie Date
Ladki Bahin Marathi Movie Announcement

या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) प्रमुख भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत सुरेखा कुडची (Surekha Kudachi), उषा नाडकर्णी (Usha Nadkarni), गौतमी पाटील (Gautami Patil), रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेघा शिंदे यांसह अनेक कलाकार या चित्रपटात सहभागी झाले आहेत. एका सरकारी योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींच्या आयुष्यात कसे बदल घडतात आणि महिलांनी एकत्र येऊन स्वतःचा विकास कसा साधला, याची कथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

Ladki Bahin Marathi Movie Date
Ladki Bahin Marathi Movie Announcement

चित्रपटाच्या पोस्टरवरील टॅगलाईनवरूनच कथानकाची दिशा लक्षात येते. एका लहानशा आर्थिक मदतीमुळे कुटुंबाच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल होऊ शकतो, हे चित्रपटात हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर महिलांची एकजूट आणि परस्पर सहकार्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कसा वाढतो, हा संदेशही यातून देण्याचा प्रयत्न आहे. (Ladki Bahin Marathi Movie)

==============================

हे देखील वाचा: Dhurandhar 2 The Revenge Trailer: रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीचा बादशाह कोण? Ranveer Singhचा खतरनाक अवतार पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

==============================

सामाजिक विषयाला मनोरंजनाची जोड देत हा चित्रपट सादर करण्यात आला आहे. आशयपूर्ण कथा, भावनिक आणि उत्सुकता वाढवणाऱ्या घडामोडी, सुमधूर गाणी आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास दिग्दर्शिका शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिची गवळणही या चित्रपटात पाहायला मिळणार असून ती प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरणार आहे. सामाजिक विषय, विनोदी सादरीकरण आणि दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट कुटुंबासह पाहण्याजोगा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १७ एप्रिलपासून हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!