
Picture Boyz Marathi Movie: चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या तरुणांची विनोदी आणि प्रेरणादायी कथा येतेय भेटीला !
चित्रपटसृष्टीत हिरो बनण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांच्या संघर्षाची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ (Picture Boyz) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १५ मे पासून सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना भरपूर हसू आणि मनोरंजन मिळेल याची खात्री आहे. नुकत्याच या चित्रपटाचा दमदार पोस्टर सोशल मीडियावर लाँच केला गेला असून प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. ‘पिक्चर बॉईज’ ही त्रिमूर्ती फिल्म्सची निर्मिती असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवादलेखन निलेशसिंग राजपूत ( Nileshsingh Rajput)यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते रवी पांडुरंग पंडितपवार आणि राजा पांडुरंग पंडितपवार आहेत, तर शिवाजी केशव पाटील सहनिर्माते म्हणून काम करत आहेत.(Picture Boyz Marathi Movie )

गाण्यांच्या दृष्टीने हा चित्रपट खूपच समृद्ध आहे, ज्यात मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी गीतलेखन केले असून, संगीतबद्धतेची जबाबदारी संध्या-प्रनिकेत यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते आणि एल. के. लक्ष्मीकांत यांसारखे सुप्रसिद्ध गायकांनी आपल्या आवाजाने चित्रपटाची शोभा वाढवली आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला पाहता, विनोद पाटील यांनी छायांकन केले असून, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. ‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट एक वेगळ्या शैलीत तयार करण्यात आला आहे. चित्रपटात सिनेमाच्या दुनियेत हिरो बनण्याच्या स्वप्नांची धडपड असलेल्या तरुणांची कथा मनोरंजक, विनोदी आणि हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. पूर्वीही चित्रपटातून चित्रपट बनण्याच्या कहाण्या अनेकदा दाखवल्या गेल्या आहेत, पण ‘पिक्चर बॉईज’ त्यात वेगळाच ठसा उमटवण्याचा प्रयत्न आहे.

या चित्रपटात प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) आणि इतर अनेक जुन्या तसेच नव्या कलाकारांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच एक खास अनुभव ठरणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मनोरंजनाचा डोस देण्यासाठी ‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहणं एक आनंददायी अनुभव ठरणार आहे. (Picture Boyz Marathi Movie )
===============================
===============================
स्वप्नांच्या दुनियेत झपाट्याने झटणाऱ्या तरुणांच्या कथा प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतील आणि त्यांच्यातल्या प्रेरणेला नक्कीच चालना देतील. त्यामुळे १५ मे पासून सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघणं एक न विसरता येणारा आनंद ठरेल.