Skip to content Skip to sidebar Skip to footer

Salbardi Marathi Movie : गावातील राजकारण आणि जुगलबंदीत शशांक शेंडे आणि ओंकार भोजने येणार आमने-सामने!

मराठी चित्रपटसृष्टीतून येत असलेला ‘सालबर्डी’ (Salbardi)हा चित्रपट गावातील राजकारण आणि रहस्यमय घटनांवर आधारित थरारक कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक, टोलेबाजी आणि सामंजस्याचा संगम या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.  गावातील पार्श्वभूमीवर रचलेली कथा शशांक शेंडे (Shashank Shende) सरपंच गणपत पाटील आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) उपसरपंच मुकिंदा थोरात यांच्या दमदार जुगलबंदीभोवती फिरते. त्यांच्या संवादांमधील चुरस, एकमेकांवरील टोलेबाजी आणि गावातील राजकारणातील रंगत कथेला वेगळाच उलगडा देते. या भूमिकांमुळे प्रेक्षकांना थरारक पण विनोदी अनुभव मिळणार आहे.(Salbardi Marathi Movie)

Salbardi Marathi Movie
Salbardi Marathi Movie

शशांक शेंडे या भूमिकेबद्दल म्हणाले की, “सालबर्डीची कथा रहस्यमय असून गावातील राजकारण आणि नात्यांचा गुंता यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ओंकारसोबत केलेले संवाद आणि ट्युनिंग पडद्यावर खास रंग भरणार आहेत.” तर ओंकार भोजने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले, “उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूपच रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव अनमोल आहे आणि प्रेक्षकांना ही जुगलबंदी नक्कीच आवडेल.”

Salbardi Marathi Movie
Salbardi Marathi Movie

चित्रपटातील कथा महाराष्ट्रातील दुर्गम ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा शोध घेते. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण झालेला हा चित्रपट अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी निर्मिती केला असून दिग्दर्शनाची जबाबदारी रमेश साहेबराव चौधरी यांनी पार पाडली आहे.(Salbardi Marathi Movie)

=============================

हे देखील वाचा: Picture Boyz Marathi Movie: चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या तरुणांची विनोदी आणि प्रेरणादायी कथा येतेय भेटीला !

=============================

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने यांसह पूजा सावंत (Pooja Sawant), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), अंशुमन विचारे (Anshuman Vichare), रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी यांसारखी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सालबर्डी’ चित्रपट १७ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गावातील राजकारण, रहस्य आणि विनोदी जुगलबंदीचा थरार अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पहावा लागणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!