
Big Boss Marathi : Ticket To Finale पूर्वी टोळीतल्या ‘या’ सदस्याची एक्झिट!
मराठीतील लोकप्रिय रिअॅलिटी शो Big Boss Marathi Season 6 आता ग्रॅन्ड फिनालेकडे वाटचाल करत आहे. ७८ दिवसांचा घरातला प्रत्येकाचा प्रवास आता स्पोर्ट्समॅन शिपनंतर भावनिक वळणावर येऊन ठेपला आहे. अशातच Ticket To Finale च्या अगदी जवळ असताना टोळी ग्रुपमधल्या आणखी एका सदस्याने घरातून एक्झिट घेतली आहे. प्रेक्षकांना खरं तर या ग्रुपचा म्होरक्या बाहेर जाईल असं वाटतं होतं पण Vishal Kotian ऐवजी Sagar Karande याचा बिग बॉसचा प्रवास संपला आहे.
दरम्यान, पहिल्या दिवसापासून सागर कारंडे त्याचा गेम खेळत होताच, परंत, विशालच्या इन्फ्लुएन्स्मुळे तो मागे पडत चालल्याचं घरातील प्रत्येक सदस्य म्हणत होते आणि त्याच कारणामुळे त्याला सातत्याने नॉमिनेट करत होते. शिवाय, फॅमेली वीक नंतर सागरचा गेम अजूनच डाऊन झाल्याचं दिसलं होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे सागरला हाता तोंडाशी आलेला Ticker To Finale चा घास सोडून बाहेर यावं लागलं. खरं तर मागच्या आठवड्यात राकेश बापट आणि विशाल कोटीयन यांच्यात पर्सनल मुद्द्यांवरुन भांडण झालं होतं. आणि ते अगदी हाणामारीपर्यंत गेलं होतं. त्यामुळे नाराज प्रेक्षक विशालला बाहेरचा रस्ता दाखवतील असं वाटलं होतं. मात्र, अनपेक्षितपणे त्या लखोट्यात सागरचं नाव आलं.

दरम्यान, लवकरच बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा फिनाले संपन्न होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल २०२६ रोजी ग्रॅन्ड फिनाले असेल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता टॉप ५ आणि टॉप २ सदस्य कोणते असणार आणि कोणते असावे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षक आणि घरातील सदस्य विशाल आणि तन्वी यांना फायनलिस्ट म्हणून पाहात आहेतच. त्यामुळे आता या दोघांपैकी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची ट्रॉफी कोण उचलणार हे लवकरच समजेल.
आता जरा सागर कारंडे यांच्या कामावर एक नजर टाकूयात… ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे सागर घराघरांत पोहोचला. त्याचा विनोदी अभिनय ते अगदी भावनिकपणे पोस्टमन होत पत्र वाचून दाखवण्याची कला प्रेक्षकांना भावली. पण तुम्हाला माहित आहे का, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सागर काय करत होता? तर, सागर एका कंपनीत दरमहा मिळणाऱ्या पगाराची नोकरी करत होता. परंतु, अभिनयाची आवड असल्यामुळे तो नोकरी करताना छोट्या -मोठ्या नाटकांत काम करत होता. पुढे नाटकांमधून कॉमेडी शो ची आणि चित्रपटांची ऑफर मिळाली आणि सागर कारंडे हे नाव अख्ख्या महाराष्ट्राच्या कायमस्वरुपी लक्षात राहीलं.

बिग बॉसच्या घरात आता विशाल कोटियन, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, राकेश बापट, राखी सावंत आणि रेवा कौरसे हे ७ सदस्य उरले आहेत. आता तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये कोण बाजी मारणार? कोणता सदस्य पहिला फायनलिस्ट ठरणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. तुम्हाला कोणत्या स्पर्धकांना फायनलिस्ट पाहायचं आहे हे आम्हाला कलाकृतीच्या इन्स्टाग्रामवर लिहून नक्की कळवा.
================================
हे देखील वाचा : Tanvi Kolte हिने प्रभूला दिलेलं ‘ते’ वचन पूर्ण केलंच!
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi