
Asha Bhosle :“हातातून माईक सुटरणार असेल तर मला मृत्यू यावा”
‘अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं…’ खरंच आशाताई अजूनही तुमचं आवाज ऐकून मन भरलं नाही आहे… अजूनही तुमच्या थरथरच्या का होईना पण तो जादूई आवाज कानांवर पडावा अशी फार इच्छा आहे… पण १२ एप्रिल २०२६ रोजी तमाम श्रोत्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली… स्वरसम्राज्ञी पद्मविभूषण Asha Bhosle यांची प्राणज्योत मालवली… आशा ताईंनी खऱ्या अर्थाने आयुष्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जगलं… कार्यक्रमांना हजेरी लावत, गाण्यांचे प्रोग्राम घरी का असेना सातत्याने त्या गात राहिल्या.. त्यांच्या निधनानंतर आशा ताईंनी व्यक्त केलेल्या शेवटच्या इच्छेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे… काय म्हणाल्या होत्या त्या जाणून घेऊयात.. (Asha Bhosle Unknown Facts)
आशा भोसले यांनी सुधीर गाडगीळ यांना २०१८ मध्ये एक मुलाखत दिली होती आणि त्यात त्यांनी देवाकडे शेवटची इच्छा मागितली होती… त्या म्हणाल्या होत्या की, “माझी एकच इच्छा आहे देवाकडून, मला गाता गाता मरण यावं, बस आणखी काही नाही”. पुढे आशाताई म्हणाल्या होत्या की, “मी माईक हाच माझा परमेश्वर आहे. दहा वर्षांची असल्यापासून मी माईकपुढे आहे आणि अजूनही माईक सोडलेला नाही. माईक सुटू नये हातून, तो सुटणार असेल तर माझा जीव जावा त्यासोबत इतकीच इच्छा आहे. कारण आयुष्यात अनेक दुःखं भोगली आहेत. ‘या दुःखांनो या’ असं माझं आयुष्य आहे”. (Last Wish Of Asha Bhosle)

आपल्या आय़ुष्य़ाला एका नदीचं उदाहरण देत आशा ताई व्यक्त झाल्या होत्या की, एखादी नदी जशी अनेक आव्हानं झेलत पुढे जात राहाते तसं माझं जीवन आहे… घरातून बाहेर पडताना माझा मूड कसाही असला तरीही स्टुडिओत जाताना हसत सगळ्यांना भेटायचं. लोकांना हसवायचं, आपणही हसायचं आणि हसत हसत गायचं. कारण माझी सगळी गाणी हसरी आहेत”. आणि खरोखरीच अगदी शेवटपर्यंत त्या गात राहिल्या आणि सगळ्यांन आपल्या सुरांतून मंत्रमुग्ध करत राहिल्या… (Asha Bhosle News)

वादक नसताना रेकॉर्ड केलेलं बॉलिवूडचं ‘हे’ एव्हरग्रीन गाणं
आशा ताईंची आणखी एक आठवण म्हणजे, वादक नसताना आशा यांनी गाणं रेकॉर्ड केलं होतं… तर हा किस्सा आहे रामगोपाल वर्मा दिग्दर्शित Rangeela (१९९५) चित्रपट तयार होत असतानाचा… झालं असं की आशाताई चेन्नईला रंगीला चित्रपटातील एका गाण्याचा रेकॉर्डींगसाठी गेल्या होत्या… बंर चित्रपटाला संगीत दिलं होतं ग्रेट A.R.Rehman यांनी… तर, गाण्याच्या रेकॉर्डींसाठी त्या स्टुडिओत गेल्या असल्या असं लक्षात आलं की एकही वादक हजर नाही… आता वादक नाही मग रेकॉर्डींग करायचं कसं? त्यातच जे गाणं रेकॉर्ड करायचं होतं ते एका वेगळ्या मूड आणि शैलीत गायचं होतं, त्यामुळे संगीतच नसेल तर गाणार कसं असा प्रश्न आशाताईंना पडला.. पण इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे आशाताईंनी वादकांशिवायच ते गाणं गायलं आणि ते गाणं होतं “तनहा तनहा यहां पे जीना. यह कोई बात है….” (Bollywood iconic song from rangeela movie)
================================
हे देखील वाचा : ८३ र्षापूर्वी Asha Bhosle यांनी गायलेलं ‘ते’ गाणं आजंही आहे लोकप्रिय!
================================
कालांतराने जेव्हा रंगीला चित्रपटातील “तनहा तनहा यहां पे जीना. यह कोई बात है….”(Urmila Matondkar) या गाण्याची ध्वनीचित्रफित रेकॉर्ड झाली तेव्हा आपलंच गाणं जे आपण वादकांशिवाय रेकॉर्ड केलं होतं त्याला रेहमान यांनी संगीताची जोड देत किती अप्रतिम तयार केलं आहे हे पाहून आशाताई आश्चर्यचकित झाल्या होत्या.. आणि प्रत्येक मुलाखतीत त्या रंगीला चित्रपटातील या गाण्याचा किस्सा आवर्जून शेअर करायच्या… (Unknown Facts About Asha Bhosle)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi