Skip to content Skip to sidebar Skip to footer

“आपली शांतता जपली पाहिजे आणि या देशावर…”; वहिदा रेहमान यांची A.R.Rehman यांच्या त्या विधानावर प्रतिक्रिया

लोकप्रिय संगीतकार ए.आर.रेहमान यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये त्यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या भेदभावावरील विधान सध्या चांगलंच चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी आपलं मत ठामपणे मांडत रेहमान यांना गोड शब्दांत कान पिळले आहेत. त्या म्हणाल्या की, “हे लहान-मोठे प्रकार प्रत्येक देशात आणि प्रत्येक क्षेत्रात घडत असतात. आपण या गोष्टींमध्ये किती आणि का पडावे? हा आपला देश आहे, येथे शांततेने राहा आणि आनंदी राहा.” (A R Rehman)

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत वहिदा यांनी बॉलिवूडमध्ये मला काम फारसं मिळत नसल्याच्या रेहमान यांच्या विधानावर भाष्य केलं आहे. वहिदा म्हणाल्या की, “चित्रपटसृष्टीत यश आणि काम मिळणं यात नेहमीच चढ-उतार येत असतात. एका ठराविक काळानंतर लोक नवीन चेहऱ्यांना संधी देऊ पाहतात, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एखादा माणूस उंचीवर पोहोचला की तो कायम तिथेच राहील असे नसते. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि त्याला सकारात्मकतेने स्वीकारायला हवं.” वहीदा शेवटी म्हणाल्या की, “माझ्या वयात मी अशा वादांपासून लांब राहणेच पसंत करते. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही, हे ठरवणे कठीण असते. त्यामुळे आपण आपली शांतता जपली पाहिजे आणि या देशावर प्रेम केले पाहिजे.” (Waheeda Rehman News)

================================

हे देखील वाचा : Ramayana : ए.आर. रेहमान यांच्यासोबत झळकणारे हॉलिवूड संगीतकार हॅन्स झिमर आहेत तरी कोण?

================================

दरम्यान, रेहमान मुलाखतीत म्हणाले होते की, “गेल्या ८ वर्षांत बॉलिवूडमध्ये कामाच्या बाबतीत भेदभाव झाला आहे. मला जे काम मिळतंय त्याचं प्रमाण कमी झालं असून, यामागे धार्मिक भेदभाव असू शकतो”, अशी शंका यावेळी त्यांनी व्यक्त केली होती. तसेच, बॉलिवूडची पॉवर सध्या अजिबात क्रिएटिव्ह नसणाऱ्या लोकांच्या हातात आहे असं देखील ते म्हणाले होते. रेहमान म्हणाले होते की, “काही लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, ज्यामुळे मला चित्रपटासाठी काम मिळणे कठीण झाले आहे.”. आता वहिदा यांच्यानंतर इंडस्ट्रीतील अजून कोणी यावर प्रतिक्रिया देणार का? किंवा रेहमान देखील यावर पुन्हा काही बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Bollywood)

तसेच, रेहमान यांनी लक्ष्मण उतेकरांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाला संगीत दिलं होतं आणि या चित्रपटाबदद्ल बोलताना ते म्हणाले होते की, “प्रेक्षक चित्रपट पाहून आंधळेपणाने प्रभावित होत नाहीत. मला वाटतं या चित्रपटात खूप काही आहे आणि त्याचा शेवट पाहण्यासारखा आहे. लोक यापेक्षा खूप अधिक समजूतदार आहेत. तुम्हाला वाटतं का की लोकं फक्त चित्रपट पाहून प्रभावित होतील. ‘छावा’ हे सर्वात जास्त पूजनीय पात्रांपैकी एक आहे. ते प्रत्येक मराठी माणसाच्या रक्ताप्रमाणे आहे. ‘छावा’ चित्रपट हा राजांची शौर्यता दाखवणारा आहे आणि त्यामुळे मला या चित्रपटाला संगीत देण्याचं भाग्य मिळालं, याचा मला अभिमान आहे”, असं उत्तर रेहमान यांनी स्पष्टपणे दिलं…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!