Skip to content Skip to sidebar Skip to footer

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने होणार सत्याचा उदय!

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth) ही मालिका सुरूवातीपासून चर्चेत आहे. आता लवकरच या मालिकेत होळी पौर्णिमे नवा अध्याय प्रेक्षकांना  पाहायला मिळणार आहे.  गोवर्धन आणि आनंदी यांच्या आयुष्यात दडलेलं पाप स्वामी उघड करतात. दत्तक घेतलेल्या मुलीवर केलेल्या अन्यायामुळे त्यांच्या आयुष्यात ओढवलेल्या संकटांचं खरं कारण समोर येणार आहे. त्याचवेळी अंबिकेला पडलेलं संकेतस्वरूप स्वप्न तिला आणि निरंजनला गोवर्धनच्या मदतीसाठी धाव घ्यायला प्रवृत्त करतं. (Jai Jai Swami Samarth Serial) 

Jai Jai Swami Samarth Marathi Serial
Jai Jai Swami Samarth Serial

दरम्यान, मुकुंदने रचलेला कपटी डाव उघडकीस येतो गोवर्धनला कोंडून ठेवून अंबिकेकडून चित्र काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न फसतो आणि कथा थेट राजदरबारात पोहोचते. हे सगळं मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.राजांच्या साक्षीने, होळी पौर्णिमेच्या दिवशी स्वामी अंबिका आणि मुकुंद या दोघांनाही स्वतःचं चित्र रेखाटण्याची संधी देतात. “नक्कल आणि सर्जनशीलता यात फरक आहे,” या स्वामींच्या वचनानंतर खऱ्या अर्थाने थराराला सुरुवात होते. 

Jai Jai Swami Samarth Marathi Serial
Jai Jai Swami Samarth Serial

अंबिकेच्या भक्तिभावातून साकारलेलं चित्र दिव्य प्रकाशाने उजळून निघतं, जिवंत भासू लागतं आणि स्वामींचा आशीर्वादित आवाज घुमतो, “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” मुकुंदची नुसती नक्कल उघडी पडते; तर अंबिकेच्या कलेतून तिचं समर्पण आणि श्रद्धा सिद्ध होते.गोवर्धन आणि आनंदी दरबारात येऊन संपूर्ण सत्य मांडतात आणि खोट्याचा अंत होतो. राजेसाहेब अंबिकेला कलेची खरी वारसदार घोषित करतात. (Jai Jai Swami Samarth Serial) 

==============================

हे देखील वाचा: Rohan Gujar Wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा, खास व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना दिली गोड बातमी

==============================

या होळिका दहनात अंबिका केवळ अन्यायाविरुद्ध उभी राहत नाही, तर आपल्या मनातील शंका-कुशंका देखील दहन करते. स्वामी अंबिका-निरंजनला पुत्ररत्नाचा आशीर्वाद देतात. मात्र कलेला संघर्षाचा शाप असल्याची भविष्यसूचना देत आगामी वळणांची चाहूलही देतात. श्रद्धा, समर्पण आणि सत्याचा विजय साजरा करणारा हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!