
Big Boss Marathi 6 : वाईल्ड कार्ड सदस्य संस्कृतीला प्रेक्षकांनी दाखवला बाहेरचा रस्ता
Big Boss Marathi 6 चा फिनाले आता जवळ येत चालला आहे. अवघ्या ४ आठवड्यांवर घरातल्या सदस्यांचा प्रवास उरला असून दहाव्या आठवड्यातील एलिमिनेशन नुकतंच झालं. Ruchita Jamdar, Prajakta Shukre यांच्या एक्झिटनंतर पहिल्या दिवसापासून घरात असलेल्या कंटेस्टंटचा प्रवास दहाव्या आठवड्यात संपेल असं वाटलं होतं. मात्र, प्रेक्षकांना खुश करण्यात असमर्थ ठरलेली वाईल्ड कार्ड स्पर्धक Sanskruti Salunkhe हिचा बिग बॉसच्या घरातला प्रवास अवघ्या २ आठवड्यात संपला आहे.
‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये गेल्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी संस्कृती, विशाल, सागर, रेवा, प्रभू, राकेश आणि दीपाली हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. खरं तर या आठवड्यात डबल एलिमिनेश्न होणार होतं. मात्र, ऐन वेळी तो निर्णय बदलून केवळ एकाच सदस्याचा प्रवास संपला आणि ती होती संस्कृती साळूंखे. दरम्यान, या आधीच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये Anushree Mane आणि संस्कृती यांच्यात राडा झाला होता, त्यावेळी अनुश्री तिला म्हणाली होती मीच तुला घराबाहेर काढणार आणि अगदीच तेच झालं. (Big Boss Marathi 6 elimination)

दरम्यान, बिग बॉस मराठीचं हे सहावं पर्व आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आलं आहे. ग्रॅण्ड फिनालेला अवघे ४ आठवडे उरले असून घरातील सदस्यांना आता जलद गतीने आपला गेम अप करण्याची नितांत गरज आहे. या आठवड्यात Vishal Kotian कॅप्टन असल्यामुळे तो थेट बाराव्या आठवड्यात पोहोचला आहे. तर, दहाव्या आठवड्याच्या शेवटी विशाल, राकेश, दीपाली, तन्वी, प्रभू, सागर, रेवा, संकेत, अनुश्री आणि राखी हे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे टॉप १० स्पर्धक ठरले आहेत.
कोण आहे संस्कृती साळूंखे?
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेणारी संस्कृती साळूंखे ही मॉडेल आणि Reality Show स्टार आहे. याआधी तिने ‘जाऊ बाई गावात’ या मराठी रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या व्यतिरिक्त तिने आणखी ३ रिअॅलिटी शो मध्येही आपला जलवा दाखवला आहे.
================================
================================
दरम्यान, आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे टॉप ५, टॉप ३ आणि टॉप २ सदस्य कोण असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षकांच्या मतांनुसार काही जणांना Tanvi Kolte आणि विशाल कोटियन यांना फायनलिस्ट म्हणून पाहायचं आहे. तर काही जणांना तन्वी आणि Raquesh Bapat याला पाहायचं आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मतांनुसार नेमकं या तिघांपैकी कुणी या शर्यतीत वरचढ असणार की यात अनुश्री मानेही सामिल होणार हे पाहणं आता अधिक महत्वाचं असणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi