Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: ”तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर…”Rakhi च्या आरोपांमुळे दिपालीला अश्रु अनावर

लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी ६ (Bigg Boss Marathi 6) चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्याकडे झुकत असून, घरातील वातावरण दिवसेंदिवस अधिक तापलेलं पाहायला मिळत आहे. शेवट जवळ येत असल्यामुळे स्पर्धकांमधील तणाव, वाद आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवत आहेत. अशातच, घरात दाखल झालेली राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. राखीच्या एन्ट्रीनंतर घरात सतत काही ना काही वाद होत असल्याचं दिसून येत आहे. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे ती अनेकदा घरातील सदस्यांशी भिडताना दिसते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी आणि दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Rakhi and Deepali Fight
Bigg Boss Marathi 6

या वादाची सुरुवात राखीने केलेल्या एका गंभीर आरोपातून झाली. दिपालीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना तिने काही वक्तव्यं केली, ज्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं. सुरुवातीला दिपाली आणि राकेश (Rakesh Bapat ) यांने या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र राखी सतत त्याच मुद्द्यावर बोलत राहिल्याने परिस्थिती चिघळली. या दरम्यान, तन्वीने मध्ये पडत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राखी कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी विशाललाही या वादात हस्तक्षेप करावा लागला. त्याने राखीला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि कुटुंबावर बोलणं चुकीचं आहे. तरीही राखीच्या वागण्यात फारसा बदल दिसला नाही.

Bigg Boss Marathi 6 Rakhi And Deepali Fight
Bigg Boss Marathi 6

राखीच्या वक्तव्यांमुळे दिपाली खूप दुखावली गेल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसतं. आजच्या भागात ती रडत रडत आपल्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे. दिपाली म्हणते, ”आंतरधर्मीय लग्न, 26 वर्षांचा संसार… ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने माझ्या लग्नाचा विषय नव्हता काढला पाहिजे होता. ती फार चुकीचं बोलली आहे. मी तिचे बाकी सगळं सहन करेल पण, ही गोष्ट नाही.” या सगळ्या प्रकारामुळे राकेशलाही वाईट वाटतं आणि तो राखीला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, ” राखी एखाद्याच्या चारित्र्यावर जाणं ही चुकीची गोष्ट आहे. तुला माझ्याबद्दल जराही काहीतरी आदर असेल, तर तू तिला मी सांगतो म्हणून एकदा सॉरी बोल.” (Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi चा दबदबा कायम; महाराष्ट्रातील नंबर 1 रिअॅलिटी शो ठरला !

============================

एकंदरीत, या वादामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं आहे. आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे. राखी खरंच दिपालीची माफी मागणार का, की हा वाद आणखी वाढणार? येणाऱ्या भागांमध्ये या संघर्षाचा शेवट कसा होतो, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!