
Digambar Naik : “बांदेकर मालवणी असूनही मला मालिकेतून बाहेर काढलं”!
‘वस्रहरण’च्या माध्यमातून मालवणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनेते Digambar Naik यांनी केला. मालिका, चित्रपट किंवा नाटक मनोरंजनाचं कोणतंही माध्यम असो आपली भाषा त्यांनी पकडून ठेवली. पण इतकं असूनही इंडस्ट्रीत त्यांच्या वाटेला स्ट्रगल आलाच. अशातच एका इंटरव्ह्युत दिगंबर यांनी Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना मालिकेतून काढल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. (Digambar Naik & Aadesh Bandekar controversy)

राजश्री मराठीला दिलेल्या इंटरव्ह्युत दिगंबर म्हणाले की, “मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. सध्या जितक्या मालिका सुरु आहेत त्यांचे निर्माते मालवणी आहेत. जर त्या मालवण्याला या मालवण्याचा अभिमान वाटला असता किंवा आत्मियता वाटत असती तर मी आज बिझी असतो. बरं आदेश बांदेकर जो माझा मित्र आहे, त्यानेच मला ‘लक्ष्य’ मालिकेतून रात्री पावणे बारा वाजता काढलं. तेव्हा चॅनल हेडचं मत होतं की हा कॉमेडी करतो तर सिरीयस भूमिका कशी करेल? आता त्यांचं मतं असू शकतं पण बांदेकरांना असं नाही वाटलं की हा मालवणी मुलगा आहे, आपल्या मालिकेत घेऊयात. मालवणी मालिकेत किंवा सिनेमात मालवणी लोकं नको असतात हेच खरं आहे“. (Marathi Entertainment News)

पुढे नाईक असं देखील म्हणाले की, ‘माझ्या कोकणातल्या प्रेक्षकांना वाईट वाटेल, पण मालवणी अभिनेता म्हणून माझा सन्मान झाला नाही. म्हणजे मी ‘फू बाई फू’ शो करत होतो तेव्हा तिथे राकेश सारंग होते, ते कोकणातले होते, परीक्षक निर्मिती सावंत सुद्धा कोकणातल्याच. पण त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक माझं Swapnil Joshi ने केलं होतं. वाईट वाटेल, पण मी स्पष्ट बोलणारा आहे. मला हे बोलताना काही फरक पडत नाही. मला आता ‘वस्त्रहरण’ नाटक केल्यानंतरच प्रेक्षकांनी मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलं आहे”.
================================
================================
मराठी माणूसच मराठी माणसाला मागे खेचतो हे विधान आपण ऐकलं आहे आणि काहींनी अनुभवलं देखील असेल. पण मराठी इंडस्ट्रीत देखील हे असे प्रकार घडतात हे ऐकून नक्कीच धक्का बसला. आता यावर निर्माते, अभिनेते Aadesh Bandekar काय प्रतिक्रिया देणार? शिवाय यात दिगंबर यांनी Nirmiti Sawant यांचाही उल्लेख केला असून त्या देखील यावर काही रिअॅक्ट होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Tending News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi