Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhuandhar 2 : बॉलिवूडच्या इतिहासात 1000 Cr कमावणारा पहिला चित्रपट!

आजवर जे मोठ मोठ्या कलाकारांना जमलं नाही ते रणवीर सिंग याने करुन दाखवलं आहे… Dhurandhar : The Revenge या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचत 1000 Cr कमवणारा पहिला चित्रपट म्हणून बहुमान मिळवला आहे… तसेच, बॉलिवूडमध्ये ‘धुरंधर’ने २०२५ मध्ये ८०० कोटींचा क्लब सुरु केला होता. आणि आता ‘धुरंधर २’ ने १००० कोटी क्लबची सुरुवात बॉलिवूडमध्ये केली आहे… जाणून घेऊयात ‘धुरंधर २’ च्या यशाबद्दल… (Dhurandhar 2 Box Office Collection)

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. 19 मार्च 2026 रोजी आपल्या भेटीला आलेला हा चित्रपट दी, कन्नड, मल्याळ, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज झाला. आणि प्रत्येक भाषेत कोटींच्य घरात दरदिवशी कमाई करत चित्रपटाने यश मिळवलं… यशच्या KGF चित्रपटाला, शाहरुखच्या Jawan चित्रपटाला मागे टाकत खरंत रणवीर सिंगने एक नवा बेन्च मार्क सेट केला आहे…

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘धुरंधर २’ ने बॉक्स ऑफिसवर १८ दिवसांत १,००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तिसऱ्या रविवारी चित्रपटाने २८.७५ कोटींची कमाई केली. तर हा आकडा हळूहळू १,०१३.७७ कोटींवर पोहोचला. ‘धुरंधर’ हा बॉलिवूडमधला एकमेव चित्रपट आहे ज्याने दोन्ही भाग मिळून जवळपास १८०० कोटींची कमाई केवळ भारतात केली आहे… आजपर्यंत हा रेकॉर्ड कोणीच केला नव्हता… (Dhurandhar 2 1000 cr)

आता थिएटरमध्ये चित्रपट गाजल्यानंतर ओटीटीवर कधी येार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
सर्व साधाराणपणे कोणताही चित्रपट थिएटरमध्ये ५०-८० दिवस पूर्ण केल्यानंतर कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतो… त्यामुळे अद्याप ‘धुरंधर २’ च्या ओटीटी रिलीजची डेट अधिकृतपणे जाहिर झाली नसली तरी मे अखेरीस किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात परत हमजा अलीला भेटण्याची संधी आपल्याला मिळणार आहे… सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे ओटीटी रिलीज होल्डवर ठेवण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे.. त्यामुळे जेव्हा IPL संपेल त्यानंतरच डिलीटली चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे… (Entertainment News)

‘धुरंधर’ सुस्साट सुरु असताना दुसरीकडे रणवीर त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत आहे… फरहान अख्तर दिग्दर्शित Don 3 : The Final Chapter मध्ये त्याची वर्णी लागली असून पुन्हा एकदा एका वेगळ्याच अंदाजात रणवीरला पाहण्याची संधी मिळणार आहे… या शिवाय प्रलय आणि शक्तिमान हे चित्रपटही येणार असल्याच्या चर्चा आहेत… तसेच, पुन्हा एकदा रणवीर सिंग आणि Deepika Padukone ही जोडी स्क्रिनवर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा असून येत्या काळात ती पुर्ण होणार का हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे… (Ranveer Singh Upcoming Movies)

================================

हे देखील वाचा : Vicky Kaushal : ‘महावतार’मध्ये झळकणार ८०० कोटींचा चित्रपट नावे असणारी मराठमोळी अभिनेत्री!

================================

आता एक नजर रणवीर सिंगच्या आधीच्या चित्रपटांवर आणि वर्ल्डवाईड कलेक्शनवर टाकूयात… ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’ 51 Cr, ‘लुटेरा’ 47 Cr, ‘गोलियो की रासलीला-रामलीला’ 212 Cr, ‘गुंडे’ 130 Cr, ‘किल दिल’ 56 Cr, ‘दिल धडकने दो’ 150 Cr, ‘बाजीराव मस्तानी’ 361 Cr, ‘बेफिकरे’ 101 Cr, ‘पद्मावत’ 568 Cr, ‘सिंबा’ 394 Cr, ‘गल्ली बॉय’ 234 Cr, ’83’ -193Cr, ‘सर्कस’ 61 Cr, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ 357 Cr, ‘धुरंधर’ 1305.7 Cr. आत्तापर्यंत रणवीरच्या कोणत्याच चित्रपटाने 600 Cr देखील पार केले नव्हते. पण केवळ Dhurandhar या फ्रेंचायझीने सगळ्या चित्रपटाच्या कमाईपेक्षा दुप्पट कमाई करुन दाखवली आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!