Skip to content Skip to sidebar Skip to footer

Zee Marathi Kamali Serial: ‘कमळी’ मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!

मराठी टेलिव्हिजनवर सध्या गाजणाऱ्या मालिकांमध्येकमळी ( Kamali Marathi Serial) ही मालिका प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे. टीआरपीच्या (TRP) शर्यतीत अव्वल असलेल्या या मालिकेत आता एक अनपेक्षित वळण येणार आहे. ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली आर्या आंबेकर (Aarya Ambekar) आता या मालिकेत नव्या भूमिकेत झळकणार आहे. आर्याची एन्ट्री ‘अनामिका’ या पात्राच्या रूपात होणार असून, तिच्या येण्याने कथानकात मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनामिकाची झलक पाहायला मिळते. अन्नपूर्णा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कारमधून उतरलेली अनामिका सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा आत्मविश्वास, तिची स्टाईल आणि तिचं व्यक्तिमत्त्व पाहून विद्यार्थी तिच्याकडे आकर्षित होतात.(Aarya Ambekar Kamali Serial Entry)

Aarya Ambekar Serial
Aarya Ambekar Kamali Serial Entry

यानंतर ती थेट ऋषीसमोर येते आणि त्याला “आवडली ना मी?” असं विचारते. तिच्या या बिनधास्त स्वभावामुळे ऋषी गोंधळून जातो. मात्र, अनामिका इथेच थांबत नाही. ती स्पष्टपणे सांगते की ती फक्त लेक्चर देण्यासाठी कॉलेजमध्ये आलेली नाही, तर लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठीही आली आहे. आणि हे सांगताना ती ऋषीलाच आपल्यासोबत घेऊन जाते. यातूनच पुढील कथानकात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे स्पष्ट होते.

Aarya Ambekar Serial
Aarya Ambekar Kamali Serial Entry

आतापर्यंत मालिकेत ऋषीचं कमळीवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तो आपल्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरतो. दुसरीकडे अनिका ऋषीवर प्रेम करत असून, ती त्याला कमळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत अनामिकाची एन्ट्री हा कथानकात आणखी एक गुंता निर्माण करणारा घटक ठरणार आहे.आता या तिघांच्या नात्यात काय बदल होणार? ऋषी आपल्या मनातील भावना कमळीसमोर मांडू शकेल का? की अनामिकाच्या आगमनामुळे त्याच्या आयुष्यात वेगळंच वळण येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.(Aarya Ambekar Kamli Serial Entry)

==========================

हे देखील वाचा: Sanai Chughade मालिकेत ‘सत्यजित’ची दमदार एन्ट्री; झी मराठीचा ‘हा’ अभिनेता १२ वर्षांनंतर पुन्हा मालिकेत दिसणार!

==========================

दरम्यान, या प्रोमोला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. “हा ट्विस्ट खूपच अनपेक्षित आहे”, “आर्याची एन्ट्री जबरदस्त” अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी उत्साह व्यक्त केला आहे. एकंदरीत, आर्याच्या एन्ट्रीमुळे ‘कमळी’ मालिकेतील भावनिक गुंतागुंत आणि नातेसंबंध अधिक रंगतदार होणार हे नक्की. आता येणाऱ्या भागांमध्ये ही कथा नेमकी कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!