
Zakir Khan : ‘मित्रा निगेटिव्हिटी पसरवणं थांबव’; बॉलिवूडकरांची वादात उडी
“बॉम्ब ल्यारी मे फुटा पर उसका धुंवा बांद्रा से जुहू तक निकला”, असं वादग्रस्त विधान कॉमेडीयन Zakhir Khan याने नुकत्याच एका अॅवॉर्ड शोमध्ये केलं होतं… त्याच्या या विधानानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली… Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावला आहेच, परंतु, इतकी वर्ष जी बॉलिवूड इंडस्ट्री Khan’s मुळे अधिक ओळखली जात होती त्यांनाही या नवख्या पोराने मागे टाकलं आहे… मात्र, असं असतानाही प्रत्येक कलाकाराने आदित्य धर याचं दिग्दर्शक म्हणून आणि रणवीरचं अभिनेता म्हणून कौतुक केलं आहे. आणि झाकीर खान याला बॉलिवूडच्या काही कलाकारांसोबतच नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं आहे. कोण काय म्हणालं आहे जाणून घेऊयात.. (Zakir Khan & Dhurandhar 2 controversy)
तर, झालं असं की झाकीर खान याने ‘धुरंधर २’ चित्रपटाच्या यशाचं कौतुक करत नाव न घेता बॉलिवूडच्या कलाकारांना टोला मारला. झाकीर म्हणाला की, “बॉम्ब तिथे ल्यारीमध्ये फुटले पण त्याचा धुर इथे बांद्रा ते जुहू दरम्यान निघाला”.. आता साहजिकच आहे की हा टोला Salman Khan, Shah Rukh Khan, Amir Khan आणि बॉलिवूडच्या इतर दिग्गज कलाकारांसाठीच होता… आता यावरच अभिनेत्री Ameesha Patel हिने सोशल मिडियावर आपलं मत व्यक्त करत झाकीरला खडे बोल सुनावले आहेत… (Bollywood Trending News)

अमिषाने पोस्ट करत लिहिलं आहे की, “मित्रा, निगेटिव्हिटी पसरवणं थांबव! बॉलिवूडनं ‘धुरंधर’चा नेहमीच आदर केला आहे. शाहरुख खान, सलमान खान, सनी देओल, हृतिक रोशन आणि अजय देवगण यांसारख्या सुपरस्टार्सनी केवळ एक नाही तर २५ पेक्षा जास्त मेगा हिट चित्रपट दिले आहेत आणि ते पुढंही देत राहतील. त्यामुळं जरा थंड घे. या याधीच या सगळ्यांनी अनेक वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत Gadar माजवलाय”. (Ameesha Patel Post for zakir khan)

तर, ‘पठाण’चे दिग्दर्शक Siddharth Anand यांनीही झाकीरच्या विधानाचा निषेध त्याला डफर म्हटलं आहे. सिद्धार्थ यांनी पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “वांद्रे-जुहूच्या लोकांनी गेल्या ५० वर्षांत सर्व मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचं योगदान कमी लेखण्यासाठी तुम्हाला खरंच मूर्ख असावं लागेल”.. इंडस्ट्रीतील कलाकारांच्या या मतांना नेटकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे… झाकीर याचं विधान बॉलिवूडमध्ये केवळ controversy क्रिएट करण्यासाठी होतं असं काही जणांनाचं म्हणणं आहे. आता या वादात आणखी कोणते कलाकार उडी घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Dhurandhar 2 Movie)
================================
हे देखील वाचा : रितेशच्या Raja Shivaji या मराठी चित्रपटात बॉलिवूड कलाकारांचा डेब्यु!
================================
बरं, एकीकडे हा वाद सुरु असताना दुसरीकडे ‘धुरंधर २’ चित्रपटाची कमाई सुरुच आहे. १९ मार्च २०२६ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २० दिवसांत वर्ल्डवाईड १५०० कोटींचा पल्ला पार केला आहे. भारतात हा आकडा १००० कोटींच्या वर आहे आणि केवळ हिंदी भाषेत हा आकडा ९०० कोटींपर्यंत पोहोचला असून लवकरच केवळ हिंदी भाषेत १००० कोटी कमावणारा रणवीर सिंगचा धुरंधर २ हा पहिला चित्रपट नक्कीच ठरेल. २०व्या दिवशी ‘धुरंधर २’ ने भारतात 1033.37 Cr आणि वर्ल्डवाईड 1641.21 Cr इतकी कमाई केली आहे… या चित्रपटाने Animal, Stree 2, Pathan या चित्रपटांना कधीच मागे टाकलं असून आता २००० कोटींचा टप्पा पार करण्याचं टार्गेट समोर ठेवलं आहे. थिएटरमध्ये १ महिना पूर्ण होण्याआधी हा पल्ला चित्रपट पार करु शकेल हा हे पाहण्यासाठी आता सगळेच आतुर आहेत. (Dhurandhar 2 box office collection)

सगळीकडे झाकीर खानच्या विधानाची चर्चा तर सुरु आहेच. पण त्यासोबतच बॉलिवूडमध्ये ‘धुरंधर’ सारखे स्पाय चित्रपट अजून तयार व्हायला हवे अशी चर्चाही जोर धरु लागली आहे. ‘बेबी’, ‘खुफिया’, Raazi, ‘द हिरो’, ‘हॉलिडे’ असे बरेच स्पाय मुव्हीज हिंदीत आले. बरं, या चित्रपटांव्यतिरिक्त यशराज फिल्म्सने ‘पठाण’, ‘जवान’, ‘एक था टायगर’ असं Spy Universe चं तयार केलं… पण त्यात स्पाय विषयी कमी आणि लव्ह स्टोरी किंवा गाणी असा धांगडधिंगाणाच अधिक वाटला… आणि म्हणूनच लोकांनी Dhurandhar किंवा URI या चित्रपटांसारखे SPY आणि Patriotic चित्रपट अधिक यायला हवे अशी मागणी केली आहे… आता येत्या काळात प्रेक्षकांची मागणी पूर्ण होणार की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न हीच स्थिती स्पाय मुव्हीजच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये दिसणार हे पाहूयात… (Bollywood spy & thriller movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi